मॉरिशसमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याचे फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

0
33

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavi) यांचे दोन दिवसांच्या मॉरिशस दौर्‍यासाठी आज सकाळी मॉरिशस (Mauritius) येथे आगमन झाले. या दौर्‍यात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे (Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Mauritius)लोकार्पण होणार असून, या कार्यक्रमाला मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ यांची उपस्थिती असणार आहे. मॉरिशसमध्ये दि. 28 एप्रिल रोजी मॉरिशस इंडिया बिझनेस समुदायाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मॉरिशसमधील विविध कंपन्यांशी भेटी होतील आणि येथेच काही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार आहेत. यात पर्यटन क्षेत्रातील करार प्रामुख्याने असणार आहेत.

मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष (Prithviraj Singh Rupoon)पृथ्वीराजसिंग रुपून यांची सदिच्छा भेट देवेंद्र फडणवीस घेतील. मॉरिशसचे (Foreign Minister Ganu)परराष्ट्र मंत्री गानू हे यावेळी सोबत असतील. त्यानंतर मॉरिशसचे (Prime Minister Pravind Kumar Jagannath)पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ यांची सदिच्छा भेट देवेंद्र फडणवीस घेतील. सायंकाळी 7.30 वाजता येथील मराठी समुदायाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होईल आणि त्यानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण होईल. दुसर्‍या दिवशी मराठी समुदायांशी भेटी असा कार्यक्रम आहे.

 

 

पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा