मुंबई : (mumbai)विरोधी पक्ष नेते (Ajit pawar)अजित पवारांवरून शिंदेसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आणि मुख्य प्रवक्ते व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात चांगलाच वाद पेटला (Deepak Kesarkar and Sanjay Shirsat) आहे. तुमची परवानगी घेऊन बोलायचे का, मी पक्षाच्या धोरणाविरुद्ध बोललो का, असा सवाल संजय शिरसाट यांनी केसरकरांना केला. हा वाद मुख्यमंत्री (Eknath Shinde)एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत असून शिरसाट हे केसरकर यांची तक्रार करण्याची शक्यता आहे. अजित पवार हे (Shinde-Fadnavis government)शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होतील, असे वक्तव्य आमदार शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
केसरकर यांनी शिरसाट यांना पक्षाच्या भूमिकेचा अंदाज नसतो व मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात नसल्याने ते पक्षाच्या विपरित भूमिका व्यक्त करतात, अशी टीकाही केली होती.त्यावर आमदार शिरसाट यांनी केसरकर यांना उत्तर दिले. मी पक्षाच्या धोरणाविरुद्ध बोललो का? माझे बोलणे तुम्हाला मान्य नाही का? तुमची परवानगी घेऊनच बोलायचे का? आणि मी काय चुकीचे बोललो? असे प्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केले. त्यावर मला तसे म्हणायचे नव्हते, अशी सारवासारव केसरकर यांनी केली. पण या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.