अमरावती जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात

0
39
निवडणूक

 

अमरावती – अमरावती(Amravati) जिल्ह्यातील होऊ घातलेल्या 12 (Agricultural Produce Market Committees)कृषी उत्पन्न बाजार समित्यापैकी आज पहिल्या टप्प्यात सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या(election) निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये अमरावती-भातकुली,नांदगाव खंडेश्वर ,चांदुर रेल्वे, धामणगाव, तीवसा मोर्शी अशा पहिल्या टप्प्यात सहा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आज होत आहे. या निवडणूक रिंगणात 12 बाजार समिती यांच्या 216 संचालक पदासाठी 430 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 30 तारखेला होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून सहकारातील सत्तेसाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये फाटाफूट झाली असल्याचे दिसून आले. अनेक पक्षांनी एकमेकांसोबत हात मिळवणी केली ,कुठे भाजपने काँग्रेससोबत, तर कुठे राष्ट्रवादीने(BJP) भाजपसोबत हात मिळवणी केल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात दिसून आले. काही ठिकाणी महाविकास आघाडीत फूट दिसून आली.

 

 

 

पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा