नागपूर – (nagpur)नागपूर ग्रामीण पोलिसांनी 50 पेक्षा जास्त ठिकाणी चोरी करण्याऱ्या एका टोळीला (arrested)अटक केली. ह्या टोळ्या नागपूर आणि मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh)चोऱ्या करत होत्या. नागपूर ग्रामीण (police)पोलिसांनी या टोळीमधील 4 आरोपींना ताब्यात घेतले असून आणखी आरोपी लवकरच जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. याविषयीची माहिती नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक (vishal anand) विशाल आनंद यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी शहबाज,जुबेल हे दोघे दिवसा बंद घर असलेल्या घराचे कुलूप तोडुन(theft) चोरी करत असत. हे दोघे ही चोरी करून मुद्देमाल सलाउद्दीनकडे आणून द्यायचे. सलाउद्दीन सोनार योगेश श्रीरंगला सबोत घेऊन या मालाची विल्हेवाट लावायचा. आरोपींनी नागपुर जिल्हातील 17 चोऱ्या,3 वर्धा आणि 1 मध्यप्रदेशातील चोरीची कबुली दिली आहे. यासोबतच पोलिसांनी आतापर्यंत 21 गुन्ह्यातील 18 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.