Land survey will be done through rover
05MREG75 गोंदिया : रोव्हरच्या माध्यमातून होणार जमीनीची मोजणी
दिया ०५ मे : गोंदिया जिल्ह्यामध्ये भूमि अभिलेख विभागाकडून रोव्हर या नविन आधुनिक ड्रोनव्दारे अचूक मोजणी करण्याकरिता वापरण्यात येणारे रोव्हरच्या सहाय्याने होत असलेल्या मोजणी कामाचे प्रात्यक्षिक मा. श्री. चिन्मय गोतमारे, जिल्हाधिकारी गोंदिया यांनी जिल्हा क्रिडा संकुल गोंदिया येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सदर ड्रोनव्दारे कशाप्रकारे कमी वेळात अचुक व पारदर्शक मोजणी काम करण्यात येतो याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले.
रोव्हर द्वारे जिल्ह्यामध्ये वनहक्क मोजणी, भुसंपादन, नगर पालिका हृदय निश्चिती मोजणी प्रकरणाच्या काम करण्यात येतील. यंत्राव्दारे मोजणी नंतर सदर डाटा जिओ रेफरन्स व्दारे सेव्ह केला जातो. सदर क्षेत्राचे उपग्रहाचे आधारे अक्षांश व रेखांश नुसार जागेची मोजणी करून सिमांकनाची कार्यवाही केली जाते. यात जलद गतीने मोजणी काम होउन नागरिकांना त्वरीत मोजणी नकाशा पुरविला जातो. त्याच प्रमाणे विभागातर्फे नगर परिषद गोंदिया येथील ६ गावांचे ड्रोन व्दारे मोजणी केली. असुन उपअधीक्षक भूमि अभिलेख, गोंदिया कार्यालयाकडुन मालकी हक्क ठरविणे बाबतची कार्यवाही घरोघरी जाउन प्रत्येक मिळकतीचे प्रायोगीक तत्वावर चौकशीचे काम सुरू केले आहे