सोलापूर – सध्या कर्नाटक विधानसभा निवडणूकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. येत्या 10 तारखेला कर्नाटकमध्ये मतदान पार पडणार आहे. निवडणूक शेवटच्या टप्प्यात आल्याने राजकीय पक्षांच्या प्रचाराला ही वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र – कर्नाटक बॉर्डरवरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा हा कर्नाटक बॉर्डरला शेजारी असल्यामुळे ही खबरदारी घेतली जातं आहे. राज्य बाहेरून येणाऱ्या – जाणाऱ्या वाहणांची कसून तपासणी होत पोलिसांकडून केली जातं आहे. त्यामुळे महाराष्ट्र – कर्नाटक बॉर्डर वरती कर्नाटक विधानसभा निवडणूकीचे परिणाम दिसून येत आहेत.