बुलढाणा – आकृतिबंधाची तात्काळ अंमलबजावणी करावी , कळस्कर समितीच्या अहवालानुसार कामकाज वाटप करावे , कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या लवकरात लवकर करण्यात याव्यात या मागण्यासाठी आज मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यात दोन तास काम बंद करून उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागण्याची दखल न घेतल्यास संघटनेच्या आदेशानुसार तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनामध्ये बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन विभागातील गजानन तनपुरे, रवी रुद्रकार, संतोष घ्यार, करण गुट्टे , रोहित काळे, तुकाराम थोरवे, प्रतिभा ठाकरे,अनंत सोर व मोटार वाहन संघटना अध्यक्ष अमोल खीरोडकर सहभागी झाले.