मुंबई (Mumbai ) : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्या-नागड्या राजकारणाची चिरफाड असून राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर व्यक्त (Uddhav Thackeray On Maharashtra Political Crisis) केली. यावळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे त्यांच्या समवेत मातोश्रीवर होते. या भेटीनंतर माध्यमांशी संवात साधताना उद्धव ठाकरे यांनी घटनापीठाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.
म्हणून राजीनामा दिला
“गद्दारांच्या समक्ष बहुमत चाचणीला सामोरे जाणे, मला मान्य नव्हते. त्यामुळे मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. जसा मी माझ्या पदाचा राजीनामा दिला तसा न्यायालयाच्या निर्णयानंतर (Eknath Shinde-Fadnavis)एकनाथ शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा” असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.
अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा
(Uddhav Thackery )उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्यपाल ही यंत्रणा आदरणीय होती. यापुढे राज्यपाल ही यंत्रणा अस्तित्त्वात ठेवावी की नाही, हे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडायला हव. पण आमदारांच्या अपत्रतेचा निर्णय जरी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असला तरी पक्षादेश हा त्यावेळीच शिवसेना म्हणजे माझी शिवसेना यांच्याकडेच राहिल. त्यामुळे आता अध्यक्षांनी यामध्ये वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.