

तोडफोडीचे राजकारण जनतेने भाजपला नाकारले -यशोमती ठाकूर
अमरावती : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या वेळी ज्या पद्धतीने हॉर्स ट्रेडिंग केली. मोठ्या प्रमाणात कर्नाटकात भ्रष्टाचार केला व जातीपातीचे राजकारण केलं त्याचीच ही चपराक भाजपला मिळाली असल्याचे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी मराठीबहुल असलेल्या सीमा वर्ती भागात जाऊन प्रचार केला मात्र त्यांनाही जनतेने नाकारलं हीच परिस्थिती महाराष्ट्रात होईल. ऑपरेशन लोटसच्या विरोधातील हा कल आहे. भाजप आणि भाजप सोबत असणाऱ्या संघटना त्या फक्त वादविवाद करण्यात माहिर आहेत. हा सगळ्यांचा अनुभव आहे. जातीभेद मध्ये आणुन काही तरी विचित्र बोलतात. हिंदु-मुस्लिम भेद कसा झाला पाहिजे याकडे ते बघत असतात. कर्नाटक मध्ये कॉंग्रेस आपलं सरकार नक्कीच बनवेल.भाजपला तोडफोडीचे राजकारण व भ्रष्टाचारामुळे जनतेने नाकारले.अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.