अकोला, 14 मे महाराष्ट्रातील अकोला येथे शनिवारी मध्यरात्री हरिपेठ भागात दोन गटांमध्ये वाद होऊन, त्यानंतर दंगल मोठी दंगल उसळली. यावेळी जाळपोळ आणि रस्त्यांवरील वाहनांची मोठ्याप्रमाणा तोडफोड झाली. तसेच पोलीस ठाण्यावरही दगडफेक करण्यात आली. या दंगलीत 10 जण जखमी झाले आहेत. दरम्यान शहरात 144 कलम लागू करण्यात आले असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
विशिष्ठ समुदायाच्या दंगलखोरांनी शनिवारी रात्री क्षुल्लक कारणाहून अकोला शहराच्या रस्त्यावरील वाहने पेटवली होती तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. परिस्थितीचे गांभीर्य पाहता शहरात अनेक ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार सोशल मीडियावर एकाने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर वाद उद्भवला.
संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अकोला शहरात मोठ्याप्रमाणात पोलीसांची तैनाती करण्यात आली आहे. दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.