नागपूर – भाजपकडून धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाहीत हे दुर्दैव आहे. मराठा आरक्षण जुन्या सरकारने नाकारलं म्हणता, मग एक वर्षांपासून तुमचं सरकार आहे काय करत आहात? हिंमत दाखवा, निवडणुकीला पुढे या असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana यांनी दिले. राज्यात करवाई होत असेल तर त्यांना माहीत नाही हे म्हणणं योग्य नाही. सुप्रीम कोर्टाने जे काही निर्णय दिला आहे, चाकोली ठरवून दिली आहे, 90 दिवसाच्या आत प्रकरण निकाली काढावे लागतील. विधानसभा अध्यक्ष असताना लोकसभा अध्यक्ष विचारत होते परमबीर कोण आहे ? हा एवढा भष्ट्राचारी अधिकारी असल्याचे त्यानी सांगितलं. मी परमबीर सिंह यांनाही बोललो होतो. दर तीन महिन्यांनी त्यांचा रिव्ह्यू व्हावं अस सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं, पण राज्यात सरकारने तसे केले नाही. अँटिलिया स्फोटाचे नाट्य होते. खरे म्हणजे ही देवेंद्र फडणवीस यांची ठरवली स्क्रिप्ट होती, ती आज खरी होताना दिसत आहे,
परमबीर सिंह यांच्या आरोपांनी महाराष्ट्राला कलंक लागला. 100 कोटी आणले कुठून हा प्रश्न अनुत्तरित असताना, महविकास आघाडीला बदनामी करण्यासाठी प्यादा म्हणून परमबीर सिंहला वापरले गेले.महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याने जो आरोप करून कलंक लावला , त्यात केंद्र किंवा राज्य सरकारने हे करवून घेतले का? असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.