मुंबई: त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या व त्यांनी मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून एसआयटी चौकशीचे व अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत.
या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती. जमावाने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा मंदिर व्यवस्थापनाने केला होता. त्यासंदर्भात व्यवस्थापनाने तक्रारही दाखल केली आहे.