

अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवारांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्धार झाला. यावेळी लोकसभेच्या 48 जागांच्या वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याचा दावा ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी केला आहे. त्यात 2019 मध्ये जिंकलेल्या त्या त्या पक्षाच्या जागा कायम राहतील व सोबतच भाजपच्या 23 मतदारसंघांत पन्नास टक्के जागा ठाकरे गट, तर उर्वरित पन्नास टक्के जागा दोन्ही काँग्रेस लढणार असल्याचे समजते. यात काही जागांत बदलही घडू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, आता काँग्रेस व ठाकरे गटाने देखील जागावाटपाचा इंकार केला आहे.