काटोल -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काटोल येथ एका कार्यक्रमात संघटनेच्या प्रतिनिधी मंडळांनी भेट घेतली. आपल्या राज्यस्तरिय समस्या बाबत सविस्तर चर्चा केली. सेवानिवृत्त शिक्षकाना ऑक्टो 21 पासून न मिळणारे उपदान ‘ अश राशीकरण ‘ १९ पासून न मिळणारे गटविमा यांच्या रकमा राज्य शासनाकडून अनुदान न आत्यामुळे रखडल्या आहेत याकडे लक्ष वेधले.प्रतिनिधीनी दिलेली निवेदनाची फाईल त्यांनी स्वतः आपल्या हातात ठेउन लगेच वाचून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. संजय भेडे यांनी ही अभ्यास पूर्ण फाईल बनविली. प्रातिनिधी मंडळात जिल्हा कार्याध्यक्ष श्रीमती किमतकर मॅडम, जिल्हा संघटन प्रमुख साहेबराव ठाकरे, राज्य प्रतिनिधी विनोद राउत जि. सरचिटणीस दीपक सावळकर, जि कार्यालय सचिव राम ठाकरे, जि मुख्य संघटक संजय भेडे, महिला सचिव सुनिता दामले,मुख्य सल्लागार सूर्यकात वंजारी, जिल्हा सहसचिव व काटोल अध्यक्ष अरुण बेडे, जि संघटक व काटोल सरचिटणीस मधूकर फरतोडे, तालूका उपाध्यक्ष सुरेश बावीस्कर,तालूका कोषाध्यक्ष भगवान बावीस्कर, तालूका कार्यकारिणी सदस्य वसंतराव निमजे,’ अशोक कडू आदी पदाधिकारी उपस्थित होते.