मुंबईः महाराष्ट्रातील मविआचे नेते कर्नाटकमध्ये शपथविधीसाठी नाही तर महाराष्ट्राचा भाग मागायला गेले आहेत. या संदर्भात ते संध्याकाळी पत्रकार परिषद घेतील आणि तसे पत्र देखील आणतील, असा टोला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांनी मविआ नेत्यांना लगावला आहे. मुनगंटीवार म्हणाले की, आमचे सरकार होते, तेव्हा तिथे भाजपचे सरकार असल्याची ओरड ते करत होते. आता ते शपथविधीसाठी नाहीत तर महाराष्ट्राचा भाग मागायला गेले आहे, असे ते म्हणाले.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आज सत्तारूढ होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातून मविआ नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी मविआ नेत्यांचा समाचार घेतला. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे, या बड्या नेत्यांना निमंत्रण आहे. मात्र, उद्धव ठाकरे जाणार नसल्याची माहिती आहे.