पाऊले चालती पंढरीची वाट….
मध्यप्रदेश परप्रांतातील28 वर्षाची परंपरा ठरलेली दिंडी
काटोल :
जन्मसी येउनी पहारे पंढरी।
न महाद्वीप देवाची सेना म वाचे विठ्ठल गाईन, नाचत पंढरी जाईन ।
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचारातून प्रेरित होऊन श्री
संत भाकरे महाराज संस्थांनाच्या वतीने 28 वि आषाढी वारी पांढूर्णा (म. प्र.) ते पंढरपूर पायदळ वारी (दिंडी ) शनिवार दि 20 मे ला नगरीत पोहचली. रविवारला सकाळी धर्तीमूर्ती मार्ग नगरीतून वर्धा जिल्ह्यात कारंजा (घाडगे) मार्गाकडे पुढील प्रवासाला निघाली.तत्पूर्वी आगमनाचे प्रसंगी काटोल नगरीत स्वागत व पूजन करण्यात आले. मध्यप्रदेश राज्य लगतच्या पांढुरणा येथून दरवर्षी पायदळ दिंडीची परंपरा करोना वर्ष सोडले तर नियमित सुरू आहे. राज्यात सर्वाधिक 889 की मी लांब पल्ल्याचे अंतर ते पण पूर्ण पायदळ चालणारी एकमेव दिंडी म्हणावी लागेल.आयोजक व त्यांना ठिकठिकाणी मदत करणाऱ्या दात्यांचे कौतुक करावे लागेल. निवास, चहापान, अल्पोपहार व जेवण सर्व व्यवस्था उत्स्फूर्तपणे सर्व मंडळी करीत असल्याने सहभागी मंडळींची संख्या कायम आहे.या ऐतिहासिक लांब पल्ल्याचे दिंडीत प्रमुख हभप तुकारामजी बालपांडे (पांढूर्णा ) तर प्रमुख मार्गदर्शक हभप महादेव महाराज चिखलागड यांचे समवेत दिंडीत ४० वारकरी सहभागी आहेत. विशेष म्हणजे वारीत सहभागी मंडळी कडून कुठलेही शुल्क आकरण्यात येत नाही. त्यांची चहा नाश्ता जेवण व निवास व्यवस्था ठरविलेल्या ठिकाणी दाणदात्याच्या सहकार्यातून होत असते. काटोल येथे भोजनाची व निवसाची व्यवस्था माजी प्रा. श्री. पिलाजी थोटे, कविता थोटे, बळीरामजी भादे, मंदाबाई भादे, चहा नाश्ता व्यवस्था भगवानजी नौकरिया, लताबाई ठाकरे, गीताबाई चरडे, पुष्पाबाई जैस्वाल, श्री जोगेकर, मारोतरावजी दूधकवळे तर निवास व्यवस्था नगर परिषदेचे राजाभोज बाल संस्कार भवन नबीरा लेआऊट पंचवटी येथे करण्यात आले होते नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष कोठे, नगरसेविका लताबाई कडू, मारोतराव नेहारे संत भाकरे महाराज महिला भजन मंडळ यांनी सहकार्य केले.अधिक मासामुळे दिंडीचे यावर्षी आगमन लवकर झाले.आषाढी वारीला ही दिंडी पंढरपूरला पोहचणार आहे., दिंडीत बालके महिला पुरुष सहभागी असून कडक उन्हात सर्व विसरून पंढरीच्या दिशेनी जाणारी पाऊले नवं उत्साह व आशा आकांक्षा ठेऊन वारीचा मार्गक्रमण करीत आहे.हे विशेष!