अहमदनगरमध्ये काही शक्ती धर्माच्या नावाने अंतर वाढवून दंगली घडवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. यावेळी त्यांनी कर्नाटकचं उदाहरण देत तेथेही त्या लोकांनी सत्तेचा वापर करून द्वेष पसरवल्याचा आरोप करत जनतेने त्यांना धडा शिकवल्याचं नमूद केलं आणि भाजपावर हल्लाबोल केला. तसेच कर्नाटकात होऊ शकतं, तर देशातील कोणत्याही राज्यात होईल यासाठी प्रयत्न करणं आपली जबाबदारी असल्याचं मत व्यक्त केलं. ते रविवारी (२१ मे) अहमदनगरमध्ये बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “धर्माच्या नावाने अंतर वाढवलं जात आहे. हा नगर जिल्हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले. याच नगर जिल्ह्यात शेवगावला दोन ते तीन दिवस बाजारपेठ बंद होती.”