नागपूर : आज नागपुरात महत्वाचे विषयासाठी आलो कोराडीत प्रदूषणाचा गंभीर विषय आहेच. मागे
नांदगाव वारेगावला येऊन गेलो होतो.
पुन्हा राखेची साठवणूक सुरू होत आहे, कोल वॉशरीज विदर्भात वाढत चालली आहे, मी पर्यावरण मंत्री असतांना हे सर्व थांबवले होते एकंदरीत सरकारचा कारभार पाहता लोकशाही नव्हे तर हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
नागपुरातील अजनीवन चा विषय गंभीर आहे, महाविकास आघाडीचे सरकार असताना शहरात मध्यभागी आलेल्या ऑक्सिजनचे भांडार असलेल्या अजनीवन तोडण्याला आम्ही स्थगिती दिली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोराडीतील सहा युनिट बंद करून 660 मेगावॅटचे दोन प्रकल्प आणण्यात येत आहेत. मुळात लोकेशन जे बंद होत आहे तिथे रोजगार जाणार आहे त्यांचे काय? सगळे युनिट एकाच ठिकाणी आणून स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ चालला आहे. मतदार जे रहिवासी आहेर त्यांचे जीवन अधिक खालावणार आहे. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नाही. कोल वॉशरीज वाढत आहेत. या संघर्षात आम्ही सोबत आहोत. जे सत्यासोबत उभे आहे त्याचेवर केंद्रीय यंत्रणा दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत दुर्दैवाने हा पॅटर्न सगळीकडे देशभरात दिसत आहे. एकप्रकारे देशात लोकशाही दिसत नसून हुकूमशाही सुरू झालेली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे वरिष्ठ नेते आहेत.महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार, हुकमशाही सरकार विरोधात लढत आहेत असेही स्पष्ट केले.