मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला भाजप प्रवेशाची 2 वर्षांपूर्वीच ऑफर मिळाली होती व त्यावेळी आपण तडजोड केली असती तर महाविकास आघाडीचे सरकार पडले असते, असा दावा त्यांनी केला आहे. (Former HM Anil Deshmukh) जयंत पाटील यांच्यावर दबाव होता. जयंत पाटील यांनी देखील याबाबत भाजपवर आरोप केला आहे. केंद्रिय यंत्रणा महाराष्ट्रात कशाप्रकारे काम सुरु आहे सगळ्यांना माहित आहे. अनेकांच्या बाबतीत असे प्रकार झाले. कोणी विरोधात बोलले, कोणी विरोधी भूमिका घेतली तर त्यांच्यामागे चौकश्या लावायच्या. भाजपचा दबाव जयंत पाटलांवर होता, असेही ते म्हणाले.
संजय राऊतांचा दावा
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव टाकला, याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. यााबतचे व्हिडिओ क्लिपही माझ्याकडे आहे. हे सर्व पुरावे अनिल देशमुखांनी स्वत: शरद पवारांनाही दाखवले होते. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच जयंत पाटील यांच्यावरही भाजप प्रवेशासाठी दबाव टाकण्यात आला. त्यांनी तो नाकारताच त्यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्यावर अशा प्रकारचा दबाव टाकला जात आहे, असा दावाही संजय राऊतांनी केलाय.