अकोला – केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दोन हजार रुपयांची पुन्हा नोटबंदी करून देशातील नागरिकांना त्रास देण्याचा हा शासनाचा मानस आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नवीन बस स्टँड चौक ते मनपा चौकापर्यंत 2000 च्या नोटेची अंतिम यात्रा काढण्यात आली. या यात्रेत मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.