बुलढाणा – अनेक शेतकऱ्यांच्या घरात भाव वाढेल या आशेने शेकडो क्विंटल कापूस अजूनही पडून आहे. मात्र, कापसाला 6 हजार 500 रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने मोताळा तालुक्यातील कोथळी येथील शेतकरी संतोष काशीराम जोहरी यांनी फर्दडीचा कापूस गुरा-ढोंराना चारून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदवला. सरकारकडे खतांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. मग सरकार दीड हजार रुपये खताची बॅग 700 रुपयांत शेतकऱ्यांना का देत नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मोताळा तालुक्यातील कोथळी येथील शेतकरी संतोष जोहरी यांची नागझरी शिवारात 10 एकर शेती आहे. आहे. त्यांना यावर्षी 120 क्विंटल कापूस झाला. कापूस घरात आणेपर्यंत त्यांना प्रतिकिलो 40 रुपये खर्च लागला आणि कापसाचे मे महिन्यातले 6 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल भाव, तर फर्दडीच्या कापसाला 40 रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी संतोष जोहरी यांनी हा कापूस घरी नेला होता. मात्र घरात जागा नाही, इतरत्र ठेवला तर अंगाला खाज येते. कापसाला चांगले भाव न मिळाल्याने 120 क्विंटल कापूस घरात आहे. गुरांना ढेप कुठून आणावी व व्यापाऱ्यांनी फर्दडीचा 40 रुपये किलो मागितलेला कापूस त्यांना न देता 12 ते 13 गुरांना दररोज 30 ते 40 किलो फर्दडीचा कापूस खाऊ घालून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला आहे.