नागपूर :- गेली 15 वर्षे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात भाजपची सत्ता आहे. दीड वर्षे झाली मनपात प्रशासक राज आहे.माजी नगरसेवक,सत्ता भोगणारे आज प्रशासनाकडे बोट दाखवित असल्याने जनता संतप्त असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहर सचिव घनश्याम निखाडे यांनी केले. निखाडे म्हणाले, आज छोट्या- छोट्या कामासाठी साफसफाईच्या दृष्टीने नागरिकांना उगीच त्रास होत आहे पावसाळा तोंडावर असताना जागोजागी कचऱ्याचे ढिगारे नालेसफाईचा गाळ रस्त्यावर पडून आहे. अशा परिस्थितीत राज्यात व केंद्रात सत्ता असताना महापालिकेत सत्ता सत्तेत असलेले नगरसेवक हतबल आहेत. नागपूरकरांनी येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन घनश्याम निखाडे यांनी केले. अलिकडेच सर्वसामान्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महापालिकेत धडक देण्यात आली. यावेळी वेळ देऊनही मनपा आयुक्त गैरहजर राहिले. एकीकडे नगरसेवक लक्ष देत नाहीत दुसरीकडे प्रशासन हेकेखोर पद्धतीने वागत आहे. सर्व सामान्यांनी जायचे कुठे, असा प्रश्न या निमित्ताने ‘शंखनाद’ न्यूज चॅनलशी बोलताना घनश्याम निखाडे यांनी उपस्थित केला.