गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पहाटेच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे धान पिकास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या रब्बी हंगामातील धान पिकाची शेतकरी कापणी करत असून अनेकांचे धान शेतात कापून ठेवलेला आहे. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांच्या धान पिकास मोठ्या प्रमाणावर हानी पोहचण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.