आळंदी घटनेच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडचे मुंडन आंदोलन

0
44

 

नाशिक : काल आळंदी येथे वारकऱ्यांसोबत झालेल्या घटनेच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलन केले. नाशिकच्या पंचवटी येथील यशवंत देवमामलेदार मंदिरासमोरील पटांगणावर कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच या घटनेचा निषेध म्हणून मुंडन आंदोलन देखील करण्यात आले. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारचे नकली हिंदुत्व वारंवार लोकांसमोर येत असल्याची टीका कार्यकर्त्यांनी केली आहे. संभाजी ब्रिगेड वारकऱ्यांसोबत असून यापुढे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा