shinde group शिंदे गटाचं ‘डॅमेज कंट्रोल’, शिंदे-फडणवीस साथ साथ!

0
82

मुंबई mumbai –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे eknath shinde यांच्या शिवसेनेकडून मंगळवारी प्रसारित जाहिरातीने भाजप व शिंदे गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले. BJP भाजपने त्याची गंभीर दखल घेतल्यावर शिंदे गटाने ‘डॅमेज कंट्रोल’ करीत बुधवारी सुधारित जाहिरात (Shiv Sena Damage Control on Advertisement) जारी केली. “केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात एकनाथ शिंदे” अशी टॅगलाईन असलेल्या जाहिरातीत राज्यात मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे लोकप्रिय असल्याचे दाखविण्यात आले. त्यावर भाजपने अंतर्गत नाराजी व्यक्त करून शिंदे गटाला इशारा दिल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे शिंदे गटाकडून जारी झालेल्या जाहिरातीतल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो देखील नसल्याने विरोधकांनी व विशेषतः ठाकरे गटाने लक्ष्य केले होते.

शिंदे गटाने दिलेल्या सुधारित जाहिरातीला “जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा” jantecha charni matha garja maharashtra maza अशी टॅगलाईन देण्यात आली असून त्यात शिवसेनाप्रमुख balasaheb thakre स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे anand dighe यांच्याही फोटोंना स्थान देण्यात आले आहे. शिवसेनेने प्रसिद्ध केलेली ही जाहिरात म्हणजे शिंदे गटाचे दबाव तंत्र असल्याचं बोललं जात आहे. त्या जाहिरातीवर भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा