कॉंग्रेसला हिंदूचे वावडेच -बावनकुळे यांचा आरोप

0
37
Bawankule

 

नागपूर :जिथे- जिथे कॉंग्रेस सत्तेत येते, तिथे -तिथे हिंदू हिताकडे दुर्लक्ष केले जाते. कर्नाटकात सत्ता येताच धर्मांतरणविरोधी कायदा रद्द करण्याचा आणि संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील धडा वगळण्याचा निर्णय सिद्धरामय्या सरकारने घेतला आहे. कॉंग्रेसला हिंदूचे वावडेच असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. बावनकुळे म्हणाले, अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण करताना बहुसंख्य हिंदूच्या हिताकडे दुर्लक्ष करण्याचे पाप कॉंग्रेस करत आहे. कॉंग्रेसच्या या निर्णयाचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. जातीय राजकारण करून समाजात दुही माजवण्याचे कॉंग्रेसचे धोरण जुनेच आहे. याविरुद्ध निश्चितच लढा उभारावा लागेल.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा