‘आदिपुरुष’ च्या विरोधात जनहित याचिका

0
42

चित्रपटावर बंदी घालण्याची केली मागणी

नवी दिल्ली, 16 जून  : आदिपुरुष चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत चित्रपटावर रामायण आणि भगवान रामाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचिकेच्या माध्यमातून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

हिंदू सेनेने दाखल केलेल्या याचिकेनुसार आदिपुरुष चित्रपटात भारतीय संस्कृतीची खिल्ली उडवण्यात आली आहे. आदिपुरुष चित्रपटामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याचिकेत भगवान राम, माता सीता, हनुमान आणि रावण यांच्याशी संबाधित आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी आणि सेन्सॉर बोर्डाला या चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्याचे आदेश द्यावेत, अशी हिंदू सेनेची मागणी आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि याचिकाकर्ते विष्णू गुप्ता यांनी म्हणाले की, उद्या, शनिवारी याचिकेत आवश्यक सुधारणा करून आदिपुरुष चित्रपटाला दिलेले सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याची तसेच चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणार आहोत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा