किटकनाशक देऊन हत्येची मनोज सानेची कबुली

0
54

(Thane)ठाणे: (Mumbai)मुंबईतील प्रचंड गाजत असलेल्या सरस्वती वैद्य हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती नवी माहिती लागली आहे. सरस्वतीची किटकनाशक देऊन हत्या केल्याची कबुली आरोपी नराधम (Manoj Sane)मनोज साने याने दिली (Mumbai Murder Case) आहे. यापूर्वी मनोज साने हा पोलिसांना वेगळीच माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत होता. सरस्वतीने आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्याकडून सुरु होता. आत्महत्येचा आळ आपल्यावर येण्याच्या भीतीने मृतदेहाचे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्याच्याकडून सातत्याने सुरु होता.

बोरीवली पोलिसांनी माहिती दिली की, आरोपी मनोज साने याने बोरिवली येथील एका दुकानातून कीटकनाशक विकत घेतले होते. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मनोजला या दुकानात नेले होते. मनोजने आपल्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याचे दुकानदारानेही सांगितले. या दुकानातून विकण्यात आलेल्या कीटकनाशकाचे नाव आणि बॅच क्रमांक हा मनोज सानेच्या फ्लॅटमध्ये सापडलेल्या केमिकलशी जुळला आहे.

२०१४ पासून मनोज साने आणि (Saraswati Vaidya) सरस्वती वैद्य हे एकत्र रहात होते. मात्र, मागील सहा महिन्यांपासून त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. काही डेटींग अॅप्सवर मनोज काही महिलांच्या संपर्कात होता, त्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
३ जून रोजी त्यांच्यात वाद झाल्यावर ४ जूनला मनोजने ताकामध्ये किटकनाशक मिसळून सरस्वतीला दिले होते. त्यातच तिचा मृत्यू झाला.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा