समृद्धी महामार्गावर दरोड्याच्या उद्देशानं धावत्या बसवर दगडफेक, प्रवाशी जखमी

0
42

जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील कारंजा जवळ काल रात्री साडेबाराच्या सुमारास नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली . दरोडेखोरांच्या बस लुटण्याच्या प्रयत्नात बसमधील पाच ते सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

समृद्धी महामार्गावर होणारे अपघात ही आता नित्याचीच बाब झालेली असताना त्यात आता चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात डिझेल चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर आता वाशिम जिल्ह्यात विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला आहे. काल रात्री नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सची बस कारंजा जवळील ढाकली किनखेड या परिसरात आलेली असताना चोरट्यांनी या बसवर दगडफेक केली. त्यात बसच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. दगडफेकीमुळे बसमधील प्रवासी सुद्धा जखमी झाले आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा