भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा

0
46

भंडारा- राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप व शिवसेनेतील (शिंदे गट) कुरबुरी सुरुच असताना मतदारसंघांवरून या दोन्ही पक्षांमध्ये भविष्यात मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. (Bhandara-Gondia Lok Sabha Constituency Politics) अलिकडेच शिंदे गटाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. ही जागा शिवसेनेच्या कोट्यात देण्यात यावी, असा ठराव भंडारा जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत अलिकडेच घेण्यात आला. येथे सुनील मेंढे हे सध्या भाजपचे खासदार आहेत.

 

या घटनेमुळे भाजपच्या वर्तुळात नाराजीचा सूर

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांच्या अध्यक्षतेखाली रावणवाडी येथे नुकतीच सभा झाली. या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. भंडारा जिल्हर्यात शिवसेनेचा एकच आमदार आहे. मात्र, किमान तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी दाखल असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. शेजारच्या गोंदिया जिल्ह्यातही शिवसेनेची संघटनात्मक ताकद असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे देण्यात यावा, असा मागणी केली जात आहे. भंडारा जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीचे नरेंद्र भोंडेकर हे एकमेव आमदार असल्याने त्यांना मंत्रीमंडळात स्थान देऊन पालकमंत्री करण्यात यावे, असा ठरावसुद्धा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीत भंडारा जिल्ह्यातील तुमसर, साकोली, भंडारा, पवनी, या चारही नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांनी केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा