राजकीय भूकंपाची वर्षपूर्ती, मुंबई पोलिसांच्या ठाकरे गटाला नोटीसा

0
48

मुंबई : शिवसेनेतील बंडाला व राज्यातील राजकीय भूकंपाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. ठाकरे गटाकडून खोके दिन तर राष्ट्रवादी काँग्रेसने आज गद्दार दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे. मात्र, असा कुठलाही दिवस साजरा करण्यास पोलिसांनी मनाई केली असून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा जारी केल्या आहेत. (Shiv Sena Split marks one year) कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी नोटीसा पाठविल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी 20 जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान संपल्यानंतर रात्रीच एकनाथ शिंदे आमदारांसह नॉट रिचेबल झाले होते. त्या रात्री ते सूरतमध्ये गेले होते. सुरतमार्गे नंतर ते गुवाहाटीकडे रवाना झाले होते. यानंतर काही दिवसांतच महाविकास आघाडी सरकार कोसळले होते.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर राज्यात शिंदे गट व भाजपचे संयुक्त सरकार स्थापन झाले. मागील वर्षभरात या राजकीय घडामोडींचे पडसाद सुरुच असून राजकीय कटुता निर्माण झाली आहे. या राजकीय घडामोडींना आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज खोके दिन तसेच गद्दार दिन साजरा केला जात आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी, शाखा प्रमुखांना, नगरसेवकांना मुंबई पोलिसांकडून नोटीसा पाठविल्या गेल्या आहेत, अशी माहिती आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा