मशाल मोर्चा काढून जय विदर्भ पार्टीने केला उर्जामंत्र्यांचा निषेध

0
45

नागपूर : कोराडीच नाही तर विदर्भात कुठेही नवीन वीज प्रकल्प उभारण्यात येऊ नये, १ एप्रिल पासून वीज दरात ३७ % टक्के वाढ करण्यात आली याविरोधात जय विदर्भ पार्टीच्या वतीने १३ जून पासून सुरु असलेल्या साखळी उपोषणाची सोमवारी संविधान चौक येथे सातव्या दिवशी सायंकाळी मशाल मोर्चा काढून सांगता झाली. राज्य सरकार व उर्जामंत्री यांच्या विरोधात आक्रोश प्रकट करण्याकारीता संविधान चौक ते व्हेरायटी चौक, गांधी पुतळा पर्यंत पायी मशाल मोर्चा काढून वीज दर वाढीचा निषेध नोंदविला गेला. राज्य सरकारने आमच्यावर महावितरणचा ६७ हजार ६४४ कोटीचा तोटा लादू नये कारण विदर्भात वीज निर्मिती होते व वीजचोरी मात्र पश्चिम महाराष्ट्रासह भिवंडी येथील कारखान्यात होते म्हणून तो भुर्दंड आम्हा वैदर्भीय जनतेला देणे लागत नाही व विजेची १ एप्रिल पासून केलेली दरवाढ जय विदर्भ पार्टीला मान्य नाही. अन्यथा ही मशाल घेऊन उर्जामंत्राचे निवासस्थान गाठावे लागेल असा इशारा देण्यात आला.
माजी आमदार एड. वामनराव चटप यांनी भेट देत जाहीर समर्थन केले यांसह विदर्भातील अन्य संघटना आणि पक्षांद्वारे समर्थन करण्यात आले. मोर्चात जय विदर्भ पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, उपाध्यक्षा रंजना मामर्डे, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, महासचिव विष्णूपंत आष्टीकर, सहसचिव अरविंद भोसले, कार्यकारी सदस्य कृष्णाजी भोंगाडे, पॉलिट ब्युरो सदस्य इंजि. तात्यासाहेब मत्ते, शहर कार्याध्यक्ष प्रा. प्रभाकर कोंडबत्तूनवार, ऍड. श्रीकांत दौलतकार, महिला आघाडी अध्यक्ष सुधा पावडे, ज्योती खांडेकर, ऍड. मृणाल मोरे, माधुरी चौहान, नरेश निमजे, राजेंद्र सतई, रवींद्र भामोडे, अमूल साकुरे, मधुसूदन कोवे, विजय मोंदेकर, मदन नवघरे, शोभा येवले, कांचन करांगळे, लता अवजेकर, हरिभाऊ पानबुडे, प्यारुभाई उर्फ नौशाद हुसैन, अनिल तिडके, गणेश शर्मा, अशफाक रहमान, रामभाऊ शेगावंकर, पराग वैरागडे, अभिजित बोबडे, बसंतकुमार चौरसिया, नीलकंठ अंभोरे, शारदा चौहान, आरती सोडे, रमेश वरुडकर, तारेश दुरुगकर, माजी नगरसेवक सुरेंद्र शुक्ला, प्रशांत तागडे, सद्दाम शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा