
मुंबई MUMBAI : चंद्रपूर CHNDRAPUR जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष #PRAKASH DEWTALE प्रकाश देवतळे यांच्यावरील कारवाई वादात सापडली होती. आता काँग्रेसचे महासचिव KC WENUGOPAL के.सी. वेणुगोपाल यांनी देवतळे यांना पदावरून हटविण्याच्या प्रदेशाध्यक्ष#Nana Patole
नाना पटोले यांचा निर्णय फिरवत स्थगिती दिली आहे. (Stay on action on Chandrapur Congress Chief) पटोले यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात असून त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरही सध्या टांगती तलवार आहे. यासंदर्भात पटोलेविरोधी वडेट्टीवार गटाने तक्रार केली होती.

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजपच्या पॅनलने हातमिळवणी करत खासदार बाळू धानोरकर यांच्या पॅनेलचा पराभव केला होता. निवडणूक निकालानंतर भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे एकत्र आनंदोत्सव साजरा करत गुलाल उधळत ढोल ताशाच्या तालावर थिरकले होते. त्यामुळे संतापलेल्या पटोले यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली होती. त्यांच्याजागी राजुराचे आमदार सुभाष धोटे यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती. पटोलेंच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.