औरंगजेबवरून मुंबईत बॅनरबाजी, पोलिस सतर्क

0
49

(Mumbai)मुंबई– (Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar)वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी (Khultabad)खुलताबाद येथे जाऊन औरंजेबाच्या कबरीवर माथा टेकविल्याच्या घटनेने वाद निर्माण झाला होता. आता मुंबईत उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचे एकत्र असलेले बॅनर्स झळकले आहेत. या बॅनर्सपायी पोलिस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. माहीम परिसरात उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेले बॅनर्स लागले. मध्यरात्री अज्ञात लोकांनी हे बॅनर्स लावले असून स्थानिक शिवसैनिकांनी तत्काळ हे बॅनर्स हटवल्याची माहिती आहे.

या बॅनर्सबाबत अद्याप ठाकरे गटाकडून कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. पोलिस स्वत:हून अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती आहे. या बॅनर्सवर मजकूर असून त्यात “औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे…!” असा मजकूर लिहिण्यात आला आहे. बॅनरवर #uddhavthackerayforaurangazeb असा हॅशटॅग लावण्यात आला आहे. बॅनरवर उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर व औरंगजेबाचे फोटो लावले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिल्याने भाजप आणि शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया आली असून प्रकाश आंबेडकरांची कृती (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे यांना मान्य आहे काय? असा सवालही या निमित्ताने (BJP)भाजपकडून उपस्थित करण्यात आलाय.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा