शेतकऱ्यांचे आंदोलन; बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा, आरोप

0
44

 

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात येवदा येथील ज्ञानेश्वर कळमकर यांच्या आशिष कृषी केंद्र समोर शेतकऱ्यांनी सकाळपासून बियाणे खरेदी करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. दरम्यान त्यांना बियाणे देताना दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
शेतकरी सकाळ पासून रांगेत असून ही शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी चांगलेच आक्रमक झाले आणि कृषी विभागाचा जोरदार निषेध आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. या कृषी विभागाचे साठे-लोटे असल्याने परिसरात बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा