चंद्रपूर : प्रशासकीय भवनातील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला आग

0
61

चंद्रपूर 6 ऑगस्ट  – जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय भवनातील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला आग लागल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली. मात्र लगेच कळल्याने लवकरच आग नियंत्रणात आली.

प्रशासकीय भवनाच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील उजव्या बाजूला असलेल्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला आग लागली. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाडीने आग विझवण्याचे काम झपाट्याने सुरु केले. त्यामुळे वेळीच आग नियंत्रणात आली. लगतच जिल्हा अधीक्षक कार्यालय असून त्यालाही आगीची झळ पोहचली. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आणि सर्व उपअधीक्षक भूमी अभिलेख व सर्व कार्यालयीन कर्मचारी वृंद यांनी जीवाची पर्वा न करता महत्त्वपूर्ण अभिलेख कार्यालयातून बाहेर काढणेकामी युद्ध पातळीवर काम केले आणि अभिलेख सुरक्षित ठिकाणी ठेवल्याची माहिती दिली. शॉटसर्किट झाल्याने सदर आग लागल्याचे स्पष्ट झाले झाले. मात्र मोठी हानी टळली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा