“आधी आमदार तर व्हा..”, भाजपचं पटोलेंना प्रत्युत्तर

0
32

मुंबई-अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली असताना त्यात नाना पटोलेंचीही भर पडली आहे. मी मुख्यमंत्री होण्याची कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State Congress President Nana Patole) यांच्या वक्तव्याची भाजपने खिल्ली उडविली आहे. पटोलेंनी सर्वप्रथम आमदार बनावे, असा खोचक सल्ला भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशीष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांनी दिलाय.
पटोलेंनी बोलून दाखविलेल्या इच्छेवर प्रतिक्रिया देताना अशिष शेलार म्हणाले की, ‘नाना पहिले आमदार बना, मुख्यमंत्री बनण्याआधी आमदार बनावे लागते. तो पहिला प्रयत्न यशस्वी होतात का बघा’, असा टोला शेलारांनी त्यांना लगावला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा