वारकरी शिक्षण संस्थेत १५ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यु

0
35

 

उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी येथे हभप काका महाराज उंबरे यांच्या आनंदआश्रम म्हणुन वारकरी प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या वाखरवाडी येथील प्रेम लहू शिंदे वय १५ वर्ष या युवकाचा मृत्यु झाला. सदर मृत्यू संशयास्पद असून ही आत्महत्या असल्याचे सांगितले जात आहे. मुलाचे वडील लहू शिंदे यांनी संस्थाचालक व शिक्षक, मुलांना शेतातील काम लावून काम न केल्यास मारहाण करत असल्याचा महाराजांवर आरोप केला आहे. मयत मुलाच्या अंगावर वळ असल्याने ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी शवविच्छेदन अहवालाप्रमाणे ५ ते ६ व्यक्तींविरुद्ध आत्महत्तेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी दिली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा