भाजपच्या महिला नेत्या सना खान बेपत्ता ; जबलपूरला शोधाशोध

0
43

 

नागपूर (NAGPUR) – नागपूर शहरातील (BJP) भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या (SNA KHAN) सना खान या गेले काही दिवसात बेपत्ता झाल्या असून कुटुंबियांच्या पोलीस तक्रारीनंतर (NAGPUR MANKAPUR POLICE)  मानकापूर पोलीस पथक जबलपूरकडे रवाना झाले असून स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे. सना ही आपल्या मित्रांसोबत जबलपूरला गेली होती. सना हिने जबलपूरवरून घरी फोन केला होता. त्यानंतर मात्र तिचा फोन बंद झाला. या नंतर घरच्या लोकांनी नागपुरातील मानकापुर पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली असून नागपूर पोलिसांनी दोन टीम जबलपूरला सना खान हिचा शोध घेण्यासाठी रवाना केल्या आहेत अशी माहिती राहुल मदने, डीसीपी झोन ​​२ यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा