बुलढाण्यात अजिंठा रोडवर कारचा भीषण अपघात

0
39

 

बुलढाणा- बुलढाण्यातील अजिंठा राष्ट्रीय महामार्गावर कारचा विचित्र अपघात झाला आहे. बुलढाणा-अजिंठा राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी गावाजवळ असलेल्या विद्युत उपकेंद्रालगत एका नाल्यावरील पुलावर भरधाव वेगात असलेली कार धडकल्याने कारचे 2 तुकडे झाले आहे. या अपघातात 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज मढकडून कार बुलढाण्याच्या दिशेने येत होती. याचवेळी पाडळी विद्युत उपकेंद्राजवळ भरधाव वेगात ही कार पुलावरील सुरक्षा कठड्यावर जाऊन धडकली आहे. यात कारचे 2 तुकडे झाले तर कार मधील दोन जण जखमी असल्याची माहिती समोर आली असून त्यांची नावे अद्याप समजू शकली नाही.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा