माथाडी कामगारांचे विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

0
33

 

नागपूर – नागपूर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे माथाडी कामगार यांचा विविध मागण्यांसाठी आज निवेदन देण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लीच्या अधिवेशनात माथाडी कामगार कायद्यात संशोधन करण्याच्या नावावर माथाडी कामगार यांचे संपवण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून करण्यात आला. माथाडी कायद्यात संशोधन करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले असून हिवाळी अधिवेशनात ही समिती आपला निर्णय घेणार आहे. या संशोधनाच्या नावावर माथाडी कामगार कायदा संपुष्टात येणार आहे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आल्याची माहिती राजीव सिंग चौहान, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यानो दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा