kirit somaiya नागडे सोमय्या कपडे घालून पुन्हा मैदानात!

0
312

उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

अगदी महिनाभरापूर्वीच ज्यांचा नागडा व्हिडिओ व्हायरल झाला, साऱ्या जगानं पाहिला. सर्वत्र छी-थू झाली. सर्वांनी लाज काढली. सोमय्यांच्या पोस्टरला जोडे मारण्याची आंदोलनेही झालीत. कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचे न राहिलेले किरीट सोमय्या निर्लज्जपणे पुन्हा राजकीय मैदानात उतरले असून, विविध राजकीय नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडण्याचा कार्यक्रम त्यांनी पुन्हा राजरोसपणे सुरू केला आहे. आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (MUMBAI)- भाजप नेते किरीट सोमय्या यांची तोप पुन्हा (BJP Leader Kirit Somaiya) एकदा धडाडली असून त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला. मुंबई महापालिकेत 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळा झाला असून यात ठाकरे गटाच्या नेत्याशी संबंधित एका कंपनीला कोविड हॉस्पिटल उभारण्याच्या नावाखाली 100 कोटींचे बेकायदा (COVID Hospital Scam in BMC) कंत्राट देण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या संगनमताने हा गैरव्यवहार करण्यात आल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

ठाकरे गटावर आरोप करण्यासाठी सोमय्या यांनी व्हिडिओ जारी केले आहेत. सोमय्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याशी संबंधित ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रायवेट लिमिटेड या कंपनीला महानगरपालिकेने मुलुंड रिचर्डसन क्रूडास मैदानावर तात्पुरते कोव्हीड हॉस्पिटल उभारण्याच्या नावावर १०० कोटी रुपयांचे गिफ्ट दिले. ज्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले, ती ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. या कंपनीने २०१९ पर्यंत काही संगीताचे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याच कंपनीला मुलुंड व दहिसर येथील कोविड हॉस्पिटल बांधणे आणि भाड्याने देण्याचा प्रकार मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या संगनमताने करण्यात आल्याचे सोमय्या म्हणाले. सिडकोने ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला 1850 खाटांचे हॉस्पिटल बांधण्याची ऑर्डर दिली. त्यासाठी रु. १० कोटी ९४ लाखांचे पेमेंटही करण्यात आले. सुमारे २५ महिने हे हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले व त्यासाठी ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला महिन्याला ३ कोटी ५९ लाख ७८ हजार रुपये भाडे म्हणजे सुमारे ९० कोटी रुपये देण्यात आले तसेच बांधण्यासाठी अधिकचे 10 कोटी देण्यात आले. या संदर्भात मुंबई पोलिस, आयकर विभाग, प्रवर्तन निदेशालय (ईडी), कंपनी मंत्रालय यांच्याकडे तक्रारही केल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा