राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार कार्यालयात ठिय्या आंदोलन

0
41

 

बुलढाणा- सरकारी बांधकाम कार्यालयामध्ये बांधकाम कामगारांचे कामे करून घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी रुजू करण्यात आले होते. त्यांचा कालावधी समाप्त झाल्याने त्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. मात्र, शासनाने नेमलेल्या कंपनीमार्फत काही कर्मचाऱ्यांना रुजू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तरीसुद्धा सरकारी कामगार अधिकारी कंत्राटी कर्मचार्‍यांना कामावर रुजू करून घेत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात यावे, या मागणीसाठी आज सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. नेतृत्व अनिल बावस्कर , शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा यांनी केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा