Ravikant Tupkar कुठल्याही पक्षात जाणार नाही-रविकांत तुपकर

0
36

बुलढाणा Buldhana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत (Swabhimani Shetkari Sanghatana) रविकांत तुपकर दुसरा गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांना तुपकर यांनीच पूर्णविराम दिलाय. मी कोणत्याही पक्षात जाणार नसून स्वाभिमानी संघटनेत राहूनच काम करणार असल्याचे स्पष्टीकरण (Ravikant Tupkar)  रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेतून दिले. संघटनेच्या शिस्त पालन समितीची बैठक मंगळवारी पुण्यात होत असून या बैठकीत ते सहभागी होणार नसल्याची माहिती आहे.

यासंदर्भात बोलताना तुपकर यांनी सांगितले की, पुण्यातील बैठकीला जाण्याचे कारणच नाही. वेळोवेळी मी राजू शेट्टी यांच्याकडे माझे म्हणणे मांडले आहे. त्यावर अद्यापही कुठलीही भूमिका घेतली गेली नाही. मी या बैठकीला येणार नसल्याचे त्यांना सांगितले होते. त्यामुळे मी यापुढेही शेतकऱ्यासाठी काम करीत राहणार आहे व ही चळवळ मोठी करण्याचे काम करणार आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा