सुदृढ बालक स्‍पर्धेला उत्‍तम प्रतिसाद

0
99

इनर व्‍हील क्‍लब नागपूरचे आयोजन

(Nagpur)नागपूर, 8 ऑगस्‍ट
इनर व्‍हील क्‍लब नागपूरच्‍यावतीने संजीवनी हॉस्पिटलमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या सुदृढ बालक स्‍पर्धेला उत्‍तम प्रतिसाद लाभला. 2 वर्षांखालील बालकांसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या या स्‍पर्धेत 20 बालकांनी सहभाग घेतला. महिलांमध्‍ये स्‍तनपानाबद्दल जागृती करण्‍याच्‍या उद्देशाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेला प्रमुख पाहुणे म्‍हणून क्‍लबच्‍या डिस्‍ट्रीक्‍ट चेअरमन शीला देशमुख यांची तर प्रमुख अतिथी म्‍हणून (Gynecologist Dr. Pragya Gijre)स्‍त्रीरोगतज्‍ज्ञ डॉ. प्रज्ञा गिजरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

इनर व्‍हील क्‍लबच्‍या अध्‍यक्ष व प्रकल्‍प संचालक (Dr. Bhagyalakshmi Rajan)डॉ. भाग्‍यलक्ष्‍मी राजन यांनी प्रास्‍ताविकातून क्‍लबच्‍या 20 वर्षांपासून घेण्‍यात येत असलेल्‍या सुदृढ बालक स्‍पर्धा व आदी उपक्रमांची माहिती दिली. ‘इनेबलिंग ब्रेस्‍टफीडिंग : मेकिंग अ डिफरन्‍स फॉर वर्किंग पॅरेंट्स’ ही यावर्षीची मध्‍यवर्ती संकल्‍पना असून त्‍याअनुषंगाने प्रश्‍नमंजुषा, नर्सेसची स्‍पर्धा, व्‍याख्‍यान, विविध महिला महाविद्यालयामध्‍ये शो आणि स्‍कीट कॉम्पिटीशन आदींचे आयोजन करण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मातेने बाळ जन्‍माला आल्‍यानंतर त्‍याला किमान एक वर्षभर तरी स्‍तनमान करावे, त्‍याने बाळ निरोगी राहते, असा सल्‍ला डॉ. प्रज्ञा ग‍िजरे यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमाला संजीवनी हॉस्पिटल व इनर व्‍हील क्‍लब नागपूरच्‍या सदस्‍यांचे सहकार्य लाभले.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा