अनिल गोटेंचा राष्ट्रवादीला रामराम

0
49

(Dhul)धुळ- (NCP leader Anil Gote)राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. पक्षातील गटबाजीमुळे आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले असून सध्यातरी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे गोटे यांनी सांगितले. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपविल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार गोटे यांनी धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन गोटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत गटबाजीमुळे आपली घुसमट होत होती. देखील गोटे यांनी वेळोवेळी जाहीर कार्यक्रमात गटबाजी बाबत उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. गोटे यांनी शरद पवारांकडे राजीनामा सादर केला आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा