जुनी पेन्शन, राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे आंदोलन

0
67

 

(Buldhana)बुलढाणा – जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुन्हा राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना आक्रमक झाली आहे. जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पहिल्या टप्प्यात आज बुलढाण्यात राज्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुचाकी रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजने संदर्भात जर राज्य सरकारने गंभीरतेने विचार केला नाही तर यापुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटने कडून देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,जिल्हा सरचिटणीस किशोर हटकर यांनी दिली.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा