एक्स-रे काढण्यासाठी रुग्णांकडून पैशांची मागणी

0
46

 

होणार तपास

(Amravti)अमरावती– अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात लवकर एक्स-रे मिळवून देण्यासाठी रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेत असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होतो. जिल्हा सामान्य रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याचाच फायदा घेत दलाल एक्स-रे लवकर मिळवून देण्यासाठी रुग्णांकडून पैसे घेत असल्याच पाहायला मिळत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्व साधारण कुटुंबातील रुग्णांसाठी आधार आहे. तेथील एक्स-रे विभागातून शेकडो रुग्णांचे एक्स-रे काढले जातात. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला तसेच बीपीएल कार्डधारक रुग्णांचे मोफत एक्स-रे काढले जातात.

बुधवार हा दिवस दिव्यांगांच्या तपासणीचा दिवस असल्याने या दिवशी जिल्हाभरातून दिव्यांग बांधव हे तपासणीसाठी येतात. त्यामुळे एक्स-रे विभागात बुधवारी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच दिवसाचा फायदा घेत एक्स-रे विभागाबाहेर एक्स-रे साठी लांबच लांब रांगा लागतात. दरम्यान, याच रांगेचा फायदा घेत रांगेतील रुग्ण तसेच नातेवाईकांकडून लवकर एक्सरे मिळून देण्यासाठी दोन दलालांकडून पैसे उकळण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आला होतो. ज्या रुग्णांनी पैसे दिले त्यांना पहिले काढून मिळत असल्याने यावेळी रुग्णांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळ यांनी दिली.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा