
(Amravti)अमरावती- गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील डाकसेवक डाकविभागात अतिशय दुर्गम भागात पहाडी क्षेत्रात अत्यंत कमी पगारात प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतांना मात्र अजूनही त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला नाही. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा मिळतात, निवृत्तीनंतर त्याचा लाभ मिळत नसल्याने अनेकदा विविध आंदोलने करण्यात आली. मात्र, सरकार बदलले. परंतु आमच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आज ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन व नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये एक दिवसीय ग्रामीण डाक सेवकांचे देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.