पंतप्रधान मोदी आज देणार विरोधकांना उत्तर

0
60

(New Dellhi)नवी दिल्ली- (Manipur)मणिपूर येथील प्रश्नावर विरोधकांनी मोदी सरकारविरुद्ध आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सध्या सुरु असलेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर देणार (PM Modi to reply on no confidence motion) आहेत. दुपारी ४ वाजताच्या सुमारास पंतप्रधान मोदी उत्तर देणार असून ते विरोधकांचा कशा पद्धतीने समाचार घेतात, याकडे लक्ष लागलेले आहे. मंगळवारपासून अविश्वास प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरु आहे. काल राहुल गांधी यांनी चर्चेत सहभागी होऊ सरकारवर तीव्र टीका केली होती. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी टीकेला उत्तर देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर मतदान होणार आहे.

काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नावर मोदी काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागलेले आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा